कठीण काळातही पर्ससीन संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 लाखांची मदत

रत्नागिरी :- राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पर्सननेट मच्छीमार संघाकडून 2 लाखांची मदत करण्यात आली आहे. मदतीचा धनादेश संघाच्या पदाधिकाऱ्यांनि ना. उदय सामंत यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सोपवला.  

राज्यावर कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. संशयित आणि कोरोना लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाला आळा बसावा यासाठी राज्यभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले. अनेक व्यवसाय ठप्प झाले. हंगामात आलेली वादळे आणि खराब हवामान यामुळ्ये यावर्षीचा निम्मा हंगाम वाया गेला. असे असताना देखील पर्ससीननेट मच्छीमार संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत कोरोना विरुद्धच्या लढाईत आपला मोलाचा हातभार लावला आहे.मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघ आणि रत्नागिरी तालुका मच्छिमार संघाकडून प्रत्येकी रुपये 1 लाखांचा धनादेश खासदार विनायक राऊत यांचे उपस्थितीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. धनादेश सुपूर्द करताना पर्ससीन संघटनेचे विकास सावंत श्री. नासिर वाघू, नुरा पटेल, श्री. हनिफ महालदार,श्री जावेद होडेकर आदी उपस्थित होते.