५ जणांना सुवर्ण पदक, ३ जणांना रौप्य, तर ९ जणांना कांस्यपदक प्राप्त
रत्नागिरी :- शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखत तब्बल १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकावले आहेत. यापैकी ५ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, ३ जणांना रौप्य, तर ९ जणांना कांस्यपदक प्राप्त झाले आहे.
सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये श्रेया मुदगल ( ५वी ), सिद्धी गोडसे ( ६ वी ), मधुरा पावसकर (७ वी ), जय कांबळे ( ७ वी ), आर्यन पानकर ( ७वी ) यांचा समावेश आहे. तर रौप्यपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये ईशा चव्हाण (२ री ), आर्षिती कारेकर ( ३री ), श्रेया नांदगांवकर (६ वी ) यांचा समावेश आहे. कांस्यपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये स्वरा कदम ( २री ), दत्तप्रसाद मुळये (५ वी), अभिषेक हणबर ( ५वी ), राजवर्धन कदम ( ६ वी ), रोशन जाधव ( ६वी ), चिन्मय सागवेकर ( ७वी ), गायत्री जोशी ( ७वी ), कार्तिक वरेकर ( ७ वी), स्वयम जाधव ( ७वी ) यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.