नाव कमी केलेल्या हजारो व्यक्ती रेशनपासून वंचित

रत्नागिरी :- कोरोनामुळे लागू झालेल्या संचारबंदीच्या काळात प्रत्येक गरजू व्यक्तीची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. परंतु लॉकडाउनपूर्वी रेशनकार्ड वरून नाव कमी केलेल्यांची संख्या मोठी आहे. रेशनकार्डवर नाव नसल्याने अनेकांना फटका बसला आहे, त्यांना रेशन मिळत नाही. अशा व्यक्तींची व्यवस्था करा अशी मागणी बहुजन विकास आघाडी कडून करण्यात आली आहे. 

एकत्रिक कुटुंबातील कार्डधारकांनी विभक्त रेशनकार्ड काढण्यासाठी माहे जानेवारी पासन प्रत्येक तहसिल कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. मुळ रेशनकार्डवरील नाव कमी केल्यामुळ्ये सदर दाखला व रेशनकार्ड तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेकडे प्रलंबीत आहेत. तसेच लग्न झालेल्या मुलींचे नाव कमी केलेल्याचे दाखले तसेच पडून आहेत. सदर दाखले कोणत्याही दुसऱ्या रेशनकार्डावर समाविष्ट झालेले नाही. सदर प्रकरणे ही जिल्हयातील प्रत्येक तहसिलदार कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. अनेक नवीन कार्ड ३ महिने होवूनही मिळालेली नाहीत, काहींची मिळाली असून ती ऑनलाइन झालेली नाहीत. त्यामुळे सदरची नवीन कार्ड धारकांची नावे व नाव कमी केलेल्यांची नावे कोणत्याही सर्वेक्षणामध्ये आलेली नाहीत. अशी हजारो कार्डधारकांवरील व्यक्ती अन्नधान्य वाचून वंचित आहेत. तरी सदर व्यक्तीना फेब्रुवारी ते मे या महिन्यातील धान्य पुरवठा होणेस विंनती बहुजन विकास आघाडी कडून करण्यात आली आहे.

यासाठी शासन – प्रशासनाने प्रत्येक तहसिल कार्यालयातून सर्वेक्षण करून किंवा प्रत्येक गावातील ग्रामपंचायती मार्फत ज्या व्यक्तींनी नवीन कार्ड करण्यासाठी व नाव कमी करण्यासाठी अर्ज दाखल केले असतील अशांची यादी करुन सदर यादी तात्काळ आपल्याकडे उपलब्ध करुन घ्यावी व सर्व लाभार्थ्यांना धान्य पुरवठा करावा. कारण सदर नाव कमी केलेल्या व्यक्ती नवीन रेशनकार्डसाठी घेतलेले दाखले हे येथील मुळ रेशनकार्डावरील रहिवासी आहेत. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य होणे गरजेचे आहे . त्यांना प्रत्येक महिन्याचे धान्य व मोफत धान्य पुरवठा व्हावा अशी विंनती बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आली आहे.