सर्वसामान्य नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या नियमात कोणतेच बदल नाहीत: डॉ.मुंढे

रत्नागिरी :- लॉकडाऊन सुरू असताना जिल्ह्यातील ठराविक गोष्टींनाच शिथिलता देण्यात आली आहे.परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी लॉकडाऊनच्या नियमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे.तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनी नियमांचे पालन करून घरीच थांबावे असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

राज्य सरकारने दि 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये जरी शिथिलता आणली असली तरी  नागरिकांसाठी कोणताही बदल झालेला नाही. त्यांच्यासाठी नियम दिलेली शिथिलता निवडक भागासाठी आहे. बांधकाम किंवा उद्योगासाठी जागेवर एकाच वेळेत पोहोचून काम करायचे आहे. बांधकाम, रस्ते बांधकाम यासाठी शिथिलता देण्यात आली असली तरी कामगारांना एकाच वेळी प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. कामगारांना दररोज जा-ये  करता येणार नाही असे डॉ मुंढे यांनी सांगितले. पालघर येथे झालेली घटना अमानवी आणि दुर्दैवी आहे. अशी घटना जिल्ह्यात होता कामा नये, यासाठी बाहेरुन कोणी आले तरी त्याची माहिती पोलिसांना द्यावी मात्र कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन डॉ. मुंढे यांनी केले. पवित्र रमजान सुरू होतोय, केंद्र, राज्य सरकारने मार्गदर्शन तत्त्वे दिली आहेत त्यामुळे नागरिकांनी नमाज, इफ्तार सामूहिक स्तरावर नको, तर वैयक्तिक करावे असे आवाहन डॉ मुंढे यांनी केले.