मुख्यमंत्री सहायता निधीसाठी को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉयइज युनियनकडून 6 लाख 39 हजारांची मदत

रत्नागिरी :- प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत को ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉयइज युनियनने 6 लाख 39 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकारिता दिली आहे. ही मदत युनियनचे अध्यक्ष शिवसेना नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी यांच्या माध्यमातून युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आज पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे सुपूर्द केली.ही मदत बँकेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या एका दिवसाच्या पगाराच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जमा करण्यात आली. कोविड- 19 चा सामना करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या उपयोगात ही मदत पडणार आहे.

को ऑपरेटिव्ह बॅंक्स एम्प्लॉयइज युनियन सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करत आहे. यावेळी निर्माण झालेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बँक एम्प्लॉयइज युनिनने केलेली मदत ही अत्यंत महत्वाची आणि समजातील अन्य घटकासाठी प्रेरणादायी आहे. पालकमंत्री अनिल परब यांना ही मदत धनादेशाच्या स्वरूपात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे उपस्थित होते. बँकेचे कार्यकारी संचालक सुनील गुरव, युनियनचे जॉईंट जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी, कोषाध्यक्ष कुणाल दाभोळकर, सरव्यवस्थापक अजय चव्हाण आदीनी हा धनादेश पालकमत्र्यांकडे सुपूर्द केला.