शुक्रवारी अवघ्या एका तासात 44 वाहनांवर कारवाई

रत्नागिरी :- गुरुवारी सायंकाळपासून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांविरोधात हाती घेण्यात आलेली कारवाई शुक्रवारी सकाळी पुन्हा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी अवघ्या एका तासात तब्बल 44 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. चर्मालय, आयसीआयसी बँक आणि उद्यमनगर येथे ही कारवाई करण्यात आली.

थोडीशी शिथिलता मिळाल्यानन्तर मोठ्या प्रमाणावर विनाकारण लोक घराबाहेर पडू लागल्याने रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळ पासून कारवाई कठोरपणे सुरू केली. गुरुवारी वाहन घेऊन आणि मैदानावर वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ९ः५० ते ११: ०० या मुदतीत उपविभागीय पोलीस रत्नागिरी यांच्या पथकाने अचानक कडक नाकाबंदी केली.

चर्मालय तिठा, आयसीआयसी बँक चौक, उदयमनगर चौक परिसर या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून 44 वाहन चालकांवर कारवाई करून विनाकारण फिरणारे वाहने जप्ती तसेच वाहनांवर हजारो रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.रोडवर किरकोळ कारणांकरीता फिरणारे लोकांना ताब्यात घेऊन बाहेर न फिरण्याबाबत समज दिली.अशा प्रकारची मोहीम सुरुच राहणार असून वाहन जप्ती कारवाई मोठया प्रमाणावर करण्यात येणार आहे असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.