शिरगाव :- चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील अल्पेश पवार हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याला नागेश पवार व रोहित निकम या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करत त्याच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे अल्पेश पवार जखमी झाला असून शिरगाव पोलिस ठाण्यात नागेश दाजी पवार व रोहित अनिल निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तिवरे गंगेचीवाडीतील नागेश पवार व रोहित निकम हे दि 14 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वा सुमारास दारू पिऊन वाडीतील लोकांना शिवीगाळ करत होते. यावेळी मंगेश कृष्णा पवार हे त्यांना समजवण्यासाठी गेले असता शिवीगाळ करून भांडण करू लागले. त्याचवेळी अल्पेश पवार यांचे वडील अंकुश पवार हे सोडवण्यासाठी गेले असता आरोप नागेश याने त्यांच्या कानाखाली मारले.
याचवेळी अल्पेश पवार दोघांना समजवन्यासाठी गेला असता त्याच्याशी सुद्धा दोघांनी वाद सुरू केले. त्याचबरोबर शिवीगाळ करून हाताच्या ठोशाने मारहाण केली तर पोटात उजव्या बाजूला चाकू मारून त्याला जखमी केले.
याबाबत नागेश पवार व रोहित निकम यांच्यावर अलोरे शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास ए. एस. आय दाभोळकर करत आहेत