जिल्हा रुग्णालयातील 32 संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :- रत्नागिरीकराना कोरोनाच्या भीतीपासून दिलासा मिळाला असून शुक्रवारी तब्बल 32 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. संगमेश्वर येथील नऊ रूग्ण आणि कळंबणी येथील 23 रुग्ण यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.  हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत.

 जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या रुग्णांचे स्वब चे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठवले जात आहेत. मिरज येथून तपासणी अहवाल दोन दिवसात जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त होत आहे. शुक्रवारी 32 अहवाल मिरज येथून प्राप्त झाले असून या 32 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.