रत्नागिरी :- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला. मुंबई, पुणे सारख्या मोठया शहरात कोरोनाने अनेक बळी घेतले. रत्नागिरीतही कोरोनाने शिरकाव करताच नागरिक प्रचंड दडपणाखाली आले. सहाजणांना लागण आणि त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी कोरोनाची धास्ती घेतली. पण या महाभयंकर संकटात रत्नगिरीकरांच्या मदतीला देवदूताप्रमाणे धावून आले ते डॉ. जांभूळकर. डॉ. जांभूळकर यांच्यावर कोरोना पेशंटची जबाबदारी सोपविण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली.
कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला त्यांनतर रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळला. तेव्हापासून वैद्यकिय विभागातील सर्व मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताय. तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत गुहागर तालुक्याती शृगारतळी येथील एक रुग्ण बरा होऊन आपल्या घरी गेला. तर तीन रुग्णांसह एका सहा महिन्याच्या बालकावर यशस्वी उपचार सुरु आहे. कोरोना रुग्ण इतर रुग्णांपेक्षा वेगळे आहेत. त्यांना उपचारा सोबतच आधार देते त्यांचे मानसिक बळ वाढविण्याचे कामहि हेच डॉक्टर व आरोग्य कर्मचारी करत आहेत. तर कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपण्याचे काम वैद्यकिय अधिकारी करत आहे.
रत्नागिरीच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात एकमेव एमडी मेडिसिन फिजीशयिन असलेले डॉ. प्रकाश जांभूळकर कार्यरत आहेत. कोरोना बाधित रुग्णाला बरे करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या सोबत डॉ. प्रकाश जांभूळकर यांची आहे. दिवसातून दोन वेळा कोरोना बाधित रुग्णाची तपासणी करणे, त्यांची चौकशी करणे. त्यांच्यामध्ये कोरोना विरुद्ध लढण्याची उर्जा निर्माण करण्याचे कामही डॉ. जांभूळकरच करत आहे.
कोरोना विभागात त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा दिनक्रमच बदलला आहे. सकाळी ९ वाजता रुग्णालायत आल्यानंतर प्रथम जनरल रुग्णांची तपासणी करतात. त्यानंतर कोरोना रुग्णांजवळ जाण्यासाठी असलेले किट परिधान करुन सर्वप्रथम ते संशयित रुग्णांची तपासणी करता. त्यांना उपचारांचे मार्गदर्शन झाल्यानंतर पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी जातात. प्रत्येक रुग्णाला भेटून त्यांच्या समस्यां जाणून घेत, त्यांच्यावर उपचार करतात. त्यांना आजाराला समोरे जाण्याची उर्जा त्यांच्यामध्ये निर्माण करतात.