कोरोना खबरदारी; जिल्ह्यात मास्क अनिवार्य

रत्नागिरी :- जिल्ह्यातून कोरोनाचा पूर्णतः बिमोड करण्यासाठी यापुढे नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच सर्व कार्यालयात कामकाज करताना मास्क घालणे आवश्यक असल्याचा सक्तीचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण सहा बाधित रुग्ण सापडले आहेत. यापैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. एक रुग्ण पूर्णतः बरा झाला असून तिघांवर उपचार सुरू आहेत. एकूण होम क्वारंटाईन 1 हजार 116 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 274 जण आहेत. आता पर्यंत 383 नमुने तपासणी करिता मिरज येथे पाठवण्यात आले होते. यापैकी 312 अहवाल निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. 2 नमुने रिजेक्ट तर 63 नमुण्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. कोरोनाचा समूळ नाश व्हावा यासाठी अनेक खबरदारीपर उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयात कामकाज करताना मास्क घालणे सक्तीचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम आता पोस्टाद्वारे घरपोच देण्याचा निर्णय जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे.