उक्षी पोलिस पाटील कौतुकास पात्र:-करीम खतीब.

रत्नागिरी:-कोरोना आजाराच्या पार्श्वभुमीवर उक्षी गावचे पोलिसपाटील श्री.अनिल जाधव हे कौतुकास्पद असे काम करत आहेत, असे उद्गार उक्षी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री. करीम खतीब यांनी काढले आहेत.अनिल जाधव हे सकाळी ७ वाजल्यापासुन रात्री ११ वाजेपर्यंत गावातल्या प्रत्येक वाडी-वस्तीत फिरत असतात.जर कोणी गावात आजारी पडल्यास त्याला त्वरित दवाखान्यात जाण्यासाठी रिक्षाची सोय करुन देतात.पोलिस पाटीलांना गावची काही तरुण मंडळीसुद्धा मदत करत आहेत. या सर्वांना उक्षी गावचे सरपंच व उपसरपंच यांची साथ मिळत आहे.
अजुन ही उक्षी गावामध्ये शासनाकडुन, ग्रामपंचायतीमधुन ग्रामस्थांना मास्क मिळाले नाहीत. तरीसुद्धा पोलिसपाटील व तरुण मंडळी तोंडाला रुमाल किंवा कपडा बांधुन काम करत आहेत. आपल्या महाराष्ट्राला इश्वराने अनमोल हिरा दिला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे. मुख्यमंत्र्यांना काश्मीरचे माजी मुख्यमंत्री जनाब उमर अब्दुल्लाह व गीतकार जावेद अख्तर ह्यांनी सलाम केला आहे. याचाच महाराष्ट्राच्या जनतेला अभिमान आहे. आपल्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व एस्.पी. तसेच नामदार उदय सामंत हे रस्त्यावर उभे राहुन लोकांना समजावत आहेत. संपुर्ण पोलिस यंत्रणा उन्हा-तान्हात काम करत आहे. तरीसुद्धा काही लोक रस्त्यावर फिरत आहेत व त्रास देत आहेत.
ही लढाई सिमेवरची नसुन प्रत्येक गावतील लोकांसाठी आहे. याचा नागरिकांनी विचार करावा, व आपल्या स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे असेही करीम खतीब म्हणाले. हा कोरोनानामक शत्रु आपल्या महाराष्ट्रातुनच नव्हे तर संपुर्ण जगातुन हद्दपार व्हावा व आपला देश, आपला महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा हीच अल्लाहजवळ प्रार्थना असे ही ते म्हणाले.