रत्नागिरी आर्मीकडून पोलीस विभागास मास्कचे वाटप

रत्नागिरी :- रत्नागिरी आर्मी या संस्थेकडून रत्नागिरी पोलिसांना मास्क वाटप करण्यात आले. 200 वेळा धुतल्यानंतरही जंतुनाशक क्षमता कायम ठेवणारा असा हा मास्क आहे. गुरुवारी 500 मास्क रत्नागिरी पोलिसांकडे जमा करण्यात आले.  सामाजिक बांधिलकी आणि सुदृढ समाज हे ब्रीद जपणा­ऱ्या रत्नागिरी आर्मीतर्फे हाय रीस्कमध्ये काम करणा­ऱ्या लोकांकरीता त्यांच्या आरोग्याची खबरदारी म्हणून वैशिष्टयपुर्ण मास्क उपलब्ध करून दिला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात कोरोना संक्रमणाचा धोका स्विकारुन रस्त्यावर काम करणा­ऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता रत्नागिरी आर्मी यांनी मास्क उपलब्ध करून दिलेले आहेत. हा मास्क 200 वेळा धुतल्यानंतरही जंतूनाशक क्षमता कायम राखणारा असा  वैशिष्टयपुर्ण मास्क आहे. सर्वसामान्य नागरीक, पोलीस दल, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, निमआरोग्य सेवेतील कार्यरत कर्मचारी यांचेसाठी हे मास्क खुप उपयोगी ठरणार आहेत.   

गुरुवारी वैशिष्टयपुर्ण 500 मास्क रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांचे उपस्थितीत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे सुपुर्द करण्यात आले. या कार्यक्रमाकरीता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, प्रभारी पोलीस उपधीक्षक (गृह) श्री.अय्युब खान, पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने यांचेसह रत्नागिरी आर्मीचे सदस्य व ज्यांचे माध्यमातून हे मास्क उपलब्ध करुन देण्यात आले रत्नागिरीतील सुप्रसिध्द डॉ.चंद्रशेखर निमकर, डॉ.निलेश शिंदे, श्री.महेश गर्दे, श्री.धीरज पाटकर, अनघा निकम असे उपस्थित होते.