जिल्हा रुग्णालयातील तिघा संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

रत्नागिरी :- जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या तिघा रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 80 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. साखरतर मधील दोन डॉक्टर्सचे कोरोना अहवाल गुरुवारी रात्री येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना संशयितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्यांना जिल्हा रुग्णालयात आणून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या 56 कोरोना संशयित उपचार घेत आहे. जिल्हा रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकारी कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करीत आहेत. जिल्हा रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅबचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी मिरज येथे पाठवले जात आहेत. मिरज येथून तपासणी अहवाल दोन दिवसात जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त होत आहे. नुकतेच तीन अहवाल मिरज येथून प्राप्त झाले असून या तिन्ही जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात 56 कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत. या 56 संशयित रुगणांपैकी 19 संशयित एकट्या साखरतर मधील आहेत. याशिवाय कळम्बणी 17, दापोली 4, गुहागर 2, संगमेश्वर 3 अशा जिल्ह्यातील 82 जणांवर उपचार सुरू आहेत.