जे. एस. डब्ल्यू. जयगड पोर्टतर्फे जिल्हा रुग्णालयाला 4 व्हेंटिलेटर प्रदान

रत्नागिरी :-  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक कंपन्यांना सीएसआरमधून कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला रत्नागिरी तालुक्यातील जे. एस. डब्ल्यू. जयगड पोर्ट यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी मल्टिपर्पज 4 व्हेंटिलेटर संच पुरविले आहेत. त्यापैकी 3 व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयात तर 1 व्हेंटिलेटर राजापूर येथील रुग्णालयाला दिला जाणार आहे. 

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक कंपन्यांना सीएसआर मधून कोरोना विषाणूच्या या संकट काळामध्ये जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आव्हानाला जेएसडब्लू जयगड पोर्ट रत्नागिरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी मल्टिपर्पज 4 व्हेंटिलेटर संच पुरविले,सदर संच  स्वीकारणेबाबतचे पत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत याना जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रदान केले. यावेळी जेएसडब्लू प्रकल्पप्रमुख ,कॅप्टन श्री रवी चंदेर ,सीएसआर हेड श्री सुधीर तेलंग, जनसंपर्क अधिकारी श्री सुदेश मोरे यांनी दिले. यावेळी आमदार श्री राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्श्मीनारायण मिश्रा,जिल्हा पोलिस अधीक्षक प्रविण मुंढे,आदी मान्यवर उपस्थित होते.