रत्नागिरी :- रत्नागिरीत बुधवारी कोरोना संशयित रुग्णसंख्येत एकाने वाढ झाली. जिल्हा रुग्णालय आणि इतर शासकीय रुग्णालयात मिळून 128 कोरोना संशयितांवर उपचार सुरू आहेत तर 1100 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा संशयित म्हणून केवळ एकच रुग्ण दाखल करण्यात आला आहे. तर मिरज येथून प्रलंबित अहवालांपैकी एक अहवाल प्राप्त झाला आहे. संगमेश्वर येथील रुग्णाचा तपासणी अहवाल असून तो निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. बुधवारी एक संशयित उपचारासाठी दाखल झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 53 झाली आहे. जिल्ह्यात विविध शासकीय रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 75 झाली आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 228 आहे. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात 53, उपजिल्हा रुग्णालय, कामथे 1, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 15, ग्रामीण रुग्णलाय गुहागर 2, ग्रामीण रुग्णालय दापोली 1, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर 3, तहसिलदार दापोली 22, तहसिलदार खेड 32, तहसिलदार रत्नागिरी 4, तहसिलदार संगमेश्वर 21, तहसिलदार चिपळूण 32, तहसिलदार मंडणगड 14, तहसिलदार लांजा 7, तहसिलदार गुहागर 7 आणि तहसिलदार राजापूर -24 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. परप्रांतातून आलेल्या आणि जिल्हयात थांबलेल्या व्यक्तींसाठी जिल्हयात 60 निवारागृहे सुरु करण्यात आली आहेत. यात 365 जणांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हयात विविध ठिकाणी असलेल्या 7318 जणांच्या जेवणाची व्यवस्था, शिवभोजन थाळी, तहसिल कार्यालये आणि एनजिओ च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.