रत्नागिरी:-रत्नागिरीत आणखी एक कोरोनाचा रुग्ण सापडला आहे, धक्कादायक म्हणजे सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरीतल्या साखरतरधील हे बाळ आहे. 103 पैकी 78 रिपोर्ट प्राप्त आज जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले. त्यामध्ये एका बाळाला कोरोना असल्याचे स्पष्ट झालं आहे. रत्नागिरीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 6 वर गेली आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.
रत्नागिरीतल्या साखरतरमध्ये एका महिलेचा रिपार्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर याच महिलेच्या घरातील आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान याच महिलांच्या घरातील एका 6 महिन्यांच्या बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातीलच बाळाला कोरोनाची लागण झाल्यानेे एकाच घरातील 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे रत्नागिरीच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
यापूर्वी जिल्ह्यात सापडलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर खेडमधील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर राजीवडा भागातील एक आणि साखरतर भागातील दोन कोरोनाबाधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात आता आणखी एका बाळाला कोरोनाची लागण झाल्याने कोरोना बाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या 6 वर गेली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.