चिपळूणमध्ये कोसळला गारांचा पाऊस

चिपळूण :-एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना दुसरीकडे पाऊसही कहर करत आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. मोठ्या प्रमाणात गारा यावेळी पडल्या. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली.
चिपळूण तालुक्यात आज काही ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यात तापमानही वाढले आहे. अखेर संध्याकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विशेषतः चिपळूण तालुक्यातल्या खाडीपट्टयात मुसळधार पावसाने वादळीवाऱ्यासह हजेरी लावली. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. भिले, केतकी, कालुस्ते या गावांसह इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडला. मात्र या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत सापडला आहे. कारण आंबा आता कुठे तयार होऊ लागला आहे, पण या पावसामुळे आंबा खराब होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.