कोरोनाचा फटका; ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा देखील शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा: सौरभ मलुष्टे

रत्नागिरी:-आंबा आणि मच्छी व्यावसायिकांप्रमाणे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या व्यवसायिकांमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचाही समावेश आहे. महिन्याभरापासून ट्रान्सपोर्ट व्यवसाय ठप्प आहे.सर्वच खर्च व्यावसायिकांच्या अंगावर पडले आहेत.कामगारांचे पगार, वाढलेले इन्शुरन्स आणि टॅक्सचे भरमसाठ दर यात भरडलेल्या व्यावसायिकांना त्यांनी काढलेल्या इन्शुरन्स आणि टॅक्सची मुदत एक महिना वाढवून मिळावी, कारण गाड्या उभ्या आहेत आणि टॅक्स,इन्शुरन्स शासनाने आगाऊ भरून घेतलेले आहेत.महिनाभर व्यवसाय ठप्प असलेल्याने अडचणीत आलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या व्यथा लक्षात घेऊन प्रशासनाने ट्रान्सपोर्ट गाड्यांच्या इन्शुरन्स आणि टॅक्सला एक महिना मुदतवाढ द्यावी अशी मागणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सौरभ मलूष्टे यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना केंद्र आणि राज्य शासन काही व्यवसाय आणि उद्योगांना शिथिलता देत आहे. यावेळी ट्रान्सपोर्ट व्यवसायाचा देखील विचार व्हावा अशी मागणी होत आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायावर अनेक गोरगरीब कुटुंब अवलंबून आहेत. हातावर पोट असणारी हमाल,चालकांसह अनेक कुटुंब हा व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवंनचनेत सापडली आहेत.अशावेळी प्रशासनाने या कुटुंबासह ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा देखील विचार करावा अशी मागणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सौरभ मलूष्टे यांनी केली आहे.
ट्रान्सपोर्ट व्यवसायाला जिल्ह्याअंतर्गत व्यवसायाची परवानगी द्यावी. ही परवानगी देताना इन्शुरन्स आणि टॅक्स ची मुदत वाढवून मिळावी. जेणे करून जिल्ह्यात रखडलेले छोटे मोठे प्रकल्प सुरू होऊन मार्गी लागतील. ग्रामपंचायत हद्दीतील लहान मोठी कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे आणि यासाठी ट्रान्सपोर्ट सुरू होणे अत्यावश्यक आहे. यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक यांच्या मागणीचा जिल्हा प्रशासनाने सहानभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी सौरभ मलुष्टे यांनि केली आहे.