डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त खंडाळा येथे आयोजित कार्यक्रम रद्द

रत्नागिरी:- देशभर सुरु असलेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिक्षाभूमी खंडाळा येथे होणारे पूजापाठ व उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुयायांनी आपल्या घरीच बुद्धपूजापाठासह आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन बावीस खेडी बौध्दजन संघ वाटद खंडाळाचे अध्यक्ष शरद रामचंद्र जाधव यांनी केले आहे.
उद्या 14 एप्रिलला खंडाळा
येथे बावीस खेडी संघ दिक्षाभूमी वाटद खंडाळा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती उत्सवाचे नियोजन केले होते. दरवर्षी हजारो आंबेडकरी अनुयायी पूजापाठ व उत्सवात सहभाग नोंदवतात. देशभरात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून ३० एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खंडाळा दिक्षाभूमी येथील १४ एप्रिल २०२० डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १२९ वा जयंती उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती शरद रामचंद्र जाधव, अध्यक्ष बावीस खेडी संघ दिक्षाभूमी वाटद खंडाळा यांनी दिली. घराबाहेर न पडता प्रत्येकाने आपल्या घरीच बुद्धपूजापाठासह आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन शरद जाधव, पदाधिकारी व गावप्रतिनिधींनी केले आहे.