जाकादेवी चिरेखाण संघटनेतर्फे
एक लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीत

रत्नागिरी:-कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ठिकठिकाणाहून मदतीचा हात दिला जात आहे. परिस्थितीचा विचार करुन रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील चिरेखाण मालक संघटनेतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे. हा धनादेश प्रातांधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. खाण मालक संघटनेचे प्रकाश जाधव, सुधीर देसाई, आनंद मयेकर, रोहीत कोळवणकर, बाबाजी माने, उदय साळवी, अंकुश तांबे, अमीत देसाई, दिपक पवार, प्रभाकर यादव, मुकेश मिरकर, संदेश मयेकर, गौरव पटेल, गजानन लांजेकर, परेश हळदणकर, उदय जाधव, संदेश महाकाळ, चित्तरंजन मुळे, स्वप्निल तोडणकर, जयवंत जाधव या वीस सदस्यांचा सहभाग आहे.