लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीसाठी ‘विकसित ॲप’

त्नागिरी:– राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे ‘विकसित ॲपची’ मदत घेण्यात येत आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या रुग्णांच्या गावांमध्ये प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. शिवखोल- राजिवडा, साखरतर आणि अलसुरे ही गावे पूर्णत: बंद करण्यात आली असून या ठिकाणी आरोग्य सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. 9 ते 11 एप्रिल दरम्यान विविध गावांमधील संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले.स्वॅब मिरज येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असूूून 103 स्वॅबचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. जिल्हयात होम क्वारंटाईन खाली 1053 व्यक्ती आहेत.