अत्यावश्यक सेवेतील घटकांसह नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना
चिपळूणः– चिपळूण शहराच्या नगराध्यक्षा सुरेखाताई खेराडे यांनी चिपळूण शहरातील नागरिकांसाठी व वृतसंकलनासारखी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पत्रकारांना माक्स आणि डेटॉल साबण वाटपाच्या कामाचा शुभारंभ काल केला.
समाजात वृत्तपत्र, युट्युब चॅनल आणि विविध माध्यमांतून सतत जनजागृती करणाऱ्या पत्रकारांना सॅनिटायझर आणि डेटॉल साबण वाटप करून शहरात नागरिकांना माक्स, डेटॉल साबण वाटप करण्याच्या कामाची सुरुवात केली.
काल दिनांक ११ एप्रिल पासून चिपळूण नगर परिषदेतर्फे शहरात नागरिकांना ७५ हजार मास्क व १ लाख डेटॉल साबण वाटण्याचे काम सुरू केला आहे.चिपळूण शहरातील सर्व प्रभागातील नगरसेवकांकडे मास्क आणि डेटॉल साबणाचा साठा सुपूर्द केला असून घरपट्टी धारक आणि गरजवंत यांना हे वाटप केले जाणार असून घरातील सर्व सदस्यांना मास्क दिला जाणार आहे.
प्रत्येक प्रभागातील नगरसेवक सदर मास्क व साबण नागरिकांना वाटप करतील अशी माहिती नगराध्यक्षा खेराडे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.