राजीवडा, साखरतरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून वॉच

त्नागिरी:-तालुक्यातील राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणच्या 3 कि मी परिसरातील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या भागात जमावबंदीचे काटेकोर पालन व्हावे यासाठी या दोन्ही ठिकाणांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. जमावबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.साखरतरमध्ये 2 तर राजीवडा येथे एक असे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरातील 3 कि मी चा परिसर सील करण्यात आला आहे. या 3 कि मी च्या परिसरात जमावबंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी या दोन्ही ठिकाणी ड्रोन च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. राजीवडा आणि साखरतर शहरातील दोन्ही कंटेनमेंट झोन वर प्रशासनाकडून ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जात आहे. नागरिकांनी कृपया घरीच राहून आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जर कोणी कायदा मोडून बाहेर फिरताना दिसलं तर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.