चिपळूण :- मध्ये गरीब व गरजू यांचेसाठी शिवभोजन आहार योजनेचा प्रारंभ तहसीलदार सूर्यवंशी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून सुरु करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टनसिंग ठेऊन मुख्याधिकारी वैभव विधाते, अनंत मोरे,चालक कल्पेश कापडी आदि उपस्थित होते.सदरची सेवा जुना बसस्थानक बाजारपेठ येथे एस.टी. कॅन्टीन येथे सुरुवात करण्यात आली आहे.
त्यानंतर मा नगराध्यक्षा सुरेखा खेराडे,नगरसेवक आशिष खातु,परिमल भोसले, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, सतीशअप्पा खेडेकर, राजन कुडाळकर, अजय भालेकर आदी मान्यवरांनी भेट दिली.यावेळी अनेक गोरगरीब नागरिकांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेतला.