रत्नागिरी :- साखरतर मधील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक महिलेचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. साखरतर मधील महिलेच्या चौदा नातेवाईकांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी एका महिलेचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा समोर आला आहे.
खेड येथील कोरोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रत्नागिरी येथील साखरतर येथील पॉझिटिव्ह महिलेच्या नातेवाईकांपैकी एका महिलेचा रिपोर्ट देखील रात्री कोरोना बाधित म्हणून आला आहे. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात संख्या वाढत असून बाहेरून आलेल्या नागरिकांना स्वताहून उपचारासाठी दाखल होण्याचे आवाहन पुन्हा एकदा प्रशासनाने केले आहे.
रत्नागिरीत आतापर्यंत 5 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. गुहागर येथील पॉझिटिव्ह रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर आता 3 रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.संबंधित महिला 49 वर्षाची आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन विभागामध्ये मध्ये उपचार सुरू आहेत.