राजीवडा, साखरतर येथील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण

रत्नागिरी:-तालुक्यातील राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाकडून या ठिकाणच्या 3 कि मी परिसरातील 22 हजार जणांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण केले आहे. जिल्ह्यात 1 हजार 34 जण होम क्वारंटाईन आहेत.

 साखरतर येथे पॉझिटिव्ह आढळलेला रुग्णाच्या नजिकच्या व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले त्या 14 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यात एक अहवाल पॉझिटिवह आला आहे. उर्वरित 13 अहवाल निगेटिव्ह आहेत.

  साखरतर येथे कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातील 3  किलोमीटर परिघात 1200 घरातील 5,825 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण  13 पथके  व  4 सुपरवायझर यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. येथील बफर क्षेत्रात 2624  घरे व 12,228 लोकसंख्या आहे. या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने तपासणी झाली आहे. या भागात 3 खासगी वैद्यकीय व्यवसायी असून त्यांना रुग्णालय सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आहे तसेच आरोग्य विभागातर्फे येथे एक ओपीडी देखली सुरु करण्यात आली आहे.

राजीवडा येथे कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातील 3  किलोमीटर परिघात 4106 घरातील 15271 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण  56 आरोग्य कर्मचाऱ्यां मदतीने पूर्ण करण्यात आले.

   अलसुरे येथील रुग्ण मरण पावला त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब नमुने आज घेण्यात आले. ते आजच तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले.

 अलसुरे येथे कोरोना विषाणू बाधित क्षेत्रातील 3  किलोमीटर परिघात 2910  घरातील 10848 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण  26 पथके  व  9 सुपरवायझर यांच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. येथील बफर क्षेत्रात 4376  घरे व 16213 लोकसंख्या आहे. या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने तपासणी झाली आहे.

  जिल्हयात असणाऱ्या होम क्वारंटाईनची संख्या  1034 आहे. या सर्वांवर प्रशासनाचे लक्ष आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 259 आहे.