जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

रत्नागिरी:-जिल्हा रुग्णालायातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी एकत्र येथे प्रथम जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या व्यथा मांडल्या आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या सोबत ही कर्मचार्यांनी चर्चा केली. स्वत:चा जीव धोक्यात घालून आम्ही काम करतोय, असे असताना आमच्यावर हल्ले होणार  असलतील तर आमच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न कर्मचार्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांनी रात्री धिंगाणा घातला. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेला विलगीकरण कक्षात जाण्यास सांगीतले. यावेळी त्या महिलेने रिपोर्ट खोटे बनवले असल्याचा कांगावा करत हंगामा केला. जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन केलेले रुग्ण कर्मचार्यांच्या अंगावरही धावून गेले. तर कोरोनाबाधीत महिलेने आरोग्य कर्मचार्याला धमकी दिली. या वार्डमध्ये ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले.
जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा आता पाचवर गेला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्ण आणि संशयित रुग्णांच्या  नातेवाईकांनी थेट जिल्हा  रूग्णालयातील कर्मचार्यांना धमकी देत अंगावर धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर नर्स, आणि वोर्डबॉय यांनी आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी सकाळी सर्वजण जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागासमोर एकत्र आले.यावेळी त्यांनी  प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी केली .

साखरतर येथील कोरोनाबाधित महिला रूग्णाच्या नातेवाईकांना जिल्हा रूग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. यांचे रिपोर्ट हे गुरूवारी रात्री आले. यातील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.या कोरोनाबाधित महिला रूग्णाला  आयसोलेशन वोर्डमध्ये हलवावे लागेल अशी माहिती संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांना आरोग्य कर्मचार्यांनी दिली. यावेळी या संशियत रुग्णांनी व कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णाने हंगामा केला. तुम्ही हे रिपोर्ट खोटे बनवून आणले असल्याचा आरोप करत कर्मचार्याच्या अंगावर धावून गेले.. आम्ही तुम्हाला बघून घेऊ. उद्या सकाळी तुम्ही सगळे कुठे असाल हे तुम्हाला कळणार नाही अशी धमकी कोरोनाबाधितच्या नातेवाईकांनी दिल्याचा आरोप जिल्हा रूग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांनी केला आहे. तसेच एका नातेवाईकाने भिंतीवरील ट्युबलाईट काढून अंगावर धावून आला.सुदैवाने तो कर्मचारी या हल्ल्यातून बचावला आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्मचार्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते ? धिंगाणा घालणार्यांवर कारवाई होणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.