आंब्याला 50 टक्के हमीभाव देण्यास केंद्र सरकार तयार 

रत्नागिरी:-नैसर्गिक आपत्तीपाठोपाठ कोरोनामुळे उध्वस्त झालेल्या आंबा शेतकऱ्याला पाठबळ मिळावे म्हणून आंबा शेतकऱयांसाठी शासनाकडे 50 टक्के अनुदानाची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे केंद्र सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून 50 टक्के अनुदानासह राज्य शासनाने हमी भावाने आंबा खरेदी करून विक्री करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिह तोमर यांनी दिला आहे. 

 हवामानाच्या बिघडलेल्या चक्रात आंबा शेतकरी अडकलेला असताना यावर्षी उत्पादन जेमतेम होत होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाऊस राहिल्याने आधीच आंबा पीक संकटात आले, आणि त्यातच आता कोरोनाच्या संकटामुळे आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले. यावर्षी आंबा पिकाचे मोठ्या पिकाचे नुकसान झाले. यामुळ्ये आंब्याला 50 टक्के हमीभाव मिळावा अशी मागणी करण्यात येत होती.

अखेर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिह तोमर यांनी कोकणातील विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून शेतकऱ्यांना गरजेचे असलेले 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला.