हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी कोरोना विरोधात लढण्यासाठी इच्छुक.

रत्नागिरी:-  रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी आजही कार्यरत आहेत. मात्र सद्या कोविड-19 या विषाणूचा उद्रेक लक्षात घेत जिल्ह्यातील परिस्थिती हाताळण्यासाठीच्या मोहिमेत काम करण्यासाठी हे कर्मचारीही इच्छुक आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीमध्ये रिक्त असणाऱया जागांवर काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. 

जिल्हा हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी सन 1994 सालापासून आज 2020 पर्यंत साथरोग काळात हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. एमपीडब्ल्यू पमाणे पाथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत गावांमध्ये पत्यक्ष सर्वेक्षणाचे काम, पल्स पोलिओ लसिकरण, शिबीर, आराखडे, एम नंबर टाकणे, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण, कीटक नाशक फवारणी करणे, साथीचे आजार व जनजागृती, रक्त नमुने गोळा करणे, मलेरिया याबाबत औषधोपचार करणे आदी कामे करीत आहेत.  

मात्र आज सर्वत्र कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे निर्माण झालेली उद्रेकजन्य परिस्थिती हातळण्यासाठी आरोग्य सेवक (एमपीडब्ल्यू) यांच्यापमाणे काम करण्यास रत्नागिरी जिल्ह्यात इच्छुक असल्याचे जिल्हा हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचाऱयांनी म्हटले आहे. आमच्या कामाचा अनुभव लक्षात घेता आरोग्य सेवा हिवताप हंगामी क्षेत्र कर्मचारी काम करण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी आरोग्य विभागातील भरतीमध्ये रिक्त जागांवर मानधनावर काम करण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष विजय राऊत यांनी संघटनेच्यावतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासनाकडे केली आहे.