रत्नागिरी:-पुणे, मुंबई येथून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 90 हजार लोक आले आहेत. त्याच्यावर प्रशासनाने पूर्ण लक्ष ठेवले आहे. गावपातळीवर नेमलेले प्रतिनीधीमार्फत त्या लोकांनी बाहेर पडू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाकडून त्यांना नेहमी मेसेज जात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी फेसबुक लाईव्हमध्ये दिली.
जिल्हाधिकारी मिश्रा, जिल्हाधिकारी पोलिसांनी अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नावर उत्तरे दिली. याला चांगला प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यात कोरोना च पहिला रुग्ण पूर्णतः बरा झाला आहे. दुसऱ्या दोन रुग्णावर उपचार सुरु असून त्यांची स्थिती सुधारत आहे. खेड येथील रुग्णाकडून वेळीच माहिती दिली असती तर त्यावर उपचार झाले असते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. विदेशातून आलेल्या लोकांना सेल्फ क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे. जेणे करून 15 दिवसात त्यांना कोरोना ची लक्षणें आहेत कि नाही हे लक्षात येईल.
नागरिकांना सुविधा देण्यासाठी काही संस्था आणि लोकप्रतिनिधी यांना त्यांनी मागणी केल्यामुळे पास दिले आहेत. त्याचा कुणी लोकप्रतिनिधी किंवा सदस्या गैर वापर करत असतील तर त्याची माहिती घेतली जाईल. या परिस्थिती मध्ये मदत करण्यासाठी पुढे येणे हा लोकप्रतिनिधीचे काम असल्यामुळे त्यांना पास दिले आहेत.
परराज्यातील 19000 लोक जिल्ह्यात विविध लोकांकडे कामानिमित्त आलेले आहेत. त्यात गुजरात, कर्नाटक पासून अन्य राज्यातील लोकांचा समावेश आहे. त्याना जेवण किंवा अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूचना ते काम करत असलेल्या मालकांना दिल्या आहेत. तसेच अशा निराधार लोकांना धन्यवाद किंवा जेवण, निवास व्यवस्था देण्यासाठी जिल्ह्यात 151 निवारा गृह शासनाने केली आहेत.
खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली सेवा सुरु ठेवायची आहे. मात्र ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आले तर त्यांची माहिती, पूर्व इतिहास तपासावा. कोरोनाशी निगडित संशय वाटल्यास त्याला तात्काळ शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पाठवावे. तसेच रुग्ण तपासताना स्वतः वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी.
कोरोनाशी निगडित रुग्ण वाढल्यास सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्जन आहे. जिल्हाधिकारी शासकीय रुग्णालय कोरोना रुग्णालय केले जात आहे. 400 बेडची तिथे व्यवस्था होऊ शकते. तर जिल्ह्यात
1300 बेड उपलब्ध आहेत. आतापर्यन्त
140 जणांच्या तपासण्या झाल्या असून 4 पोझीटीव्ही आले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. परदेशातून आलेल्या लोकांची संख्या सुमारे एक हजार असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.