लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका; मदतीची मागणी

रत्नागिरी:-लॉकडाऊनचा रिक्षा व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. हातावर पोट असणारे अनेक तरुण आणि कुटुंब चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. अडचणीच्या काळात अन्य गरजू आणि उद्योग व्यवसायांना केंद्र व राज्य शासन ज्या प्रमाणे मदतीचा हात देते त्या प्रमाणे रिक्षा व्यावसायिकांना ही मदत करा अशी मागणी रत्नदुर्ग रिक्षा व्यवसायिक संघटनेने  उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वरे केली

आहे.
रिक्षा चालक-मालक देखील लोकशाहीचा एक महत्त्वाचा घट आहे. त्यांच्या जीवावर कुटुंबाच्या उदर्निवाहासह मुलांचे शिक्षण, औषधोपचार, अत्यावश्यक व जीवनावश्यक साहित्य व शासनाचा विविध टॅक्स इत्यादी रिक्षा व्यवसायावर अवलंबुन आहे. सद्यस्थितीत देशात पसरलेल्या कोरोना व्हायरस विषाणूची साखळी भारतातुन नष्ट करण्यासाठी राज्य व केंद्र सरकराने देशात लॉकडान केले आहे. आमची रोजी-रोटी आणि उदर्निवाहाचे सादन असलेला रिक्षा व्यवसाय पुर्णपणे बंद आहे. त्याचा मोठा परिणाम रिक्षा चालक-मालकांवर झाला आहे. ते सर्व आर्थिक विवंचनेत अडकले आहेत. आमच्या कुटुंबावर उदर्निवाहाचा अतिशय गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. रिक्षा चालक-मालक चिताग्रस्त आहेत. या आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ज्या प्रकारे गरजुंना व उद्योगधंद्यांना आर्थिक व इतर मार्गाने मदत केली आहे. त्याच प्रमाणे गरीब व हातावर पोट असलेल्या रिक्षा चालक-मालक संघटनेला आर्थिक मदत करावी,  अशी मागणी रत्नादुर्ग रिक्षा व्यवसायिक संघटनेने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.