रत्नागिरी:-कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक परिस्थितीतच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. या निर्णयाचा अनेक मच्छीमार खलाशाना फटका बसला आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी समुद्रात गेलेले आणि लॉकडाऊन नंतर परतलेले अनेक मच्छीमार खलाशी बोटींवरच अडकले आहेत. अनेक बोटी उशिरा किनाऱ्यावर परतल्या. यामुळ्ये समुद्रातून येऊन सर्व मच्छिमार बांधव बोटीवरच अडकून पडले आहेत.
कोरोनामुळ्ये अचानकपणे संचारबंदी लागू झाली. आधीच आर्थिक संकटात मासेमारी व्यवसाय आलेला असताना हा संचारबंदीत मच्छिमार बांधवाना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. संपूर्ण मच्छीमारी बंद असल्याने बंदरामध्ये अनेक मच्छिमार बोटी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे बंदरामध्येही गर्दी झालेली आहे. व मच्छिमार बांधवांचे स्वास्थ्य ही बिघडत आहे. तरी या मच्छिमार कामगार बांधवांची वेगवेगळया बंदरातन गर्दीतून सुटका व आरोग्य तपासणी करून प्रत्येक बंदरातून मच्छिमार कामगारांना सखरूप घरी जाणेसाठी परवानगी द्यावी. व मच्छिमार कामगारांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे अशी मागणी खारवी समाज परिवर्तन मंच पुर्णगड यांच्या वतीने करण्यात आली आहे.