मुंबईतून शिरगावमध्ये आलेले चौदाजण जिल्हा रुग्णालयात दाखल

रत्नागिरी:- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.अशातच मुंबई येथील ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशा भागातून लॉक डाऊनपूर्वी व लॉक डाऊननंतर रत्नागिरीत आलेल्या तब्बल १२६ जणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यापैकी १४ जणांना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ग्रामस्तरावर सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य विभागाच्या पथकाला पथकाने मुंबईतून आलेल्या १२६ जणांचा शोध घेतला आहे. त्यामुळे या सर्वांना तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचे दोन पॉझिटिव रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. त्यातील एकजण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील तर दुसरा रत्नागिरी शहरातील राजिवडा नजिकच्या शिवखोल येथील असल्याचे निष्पन्न झाले. दोन्हीजण मुंबईतूनच रत्नागिरीत आले असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोग्य विभागाने मुंबईतून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.कोरोणाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यासह देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या तरीही विविध कारणे सांगून मुंबईतील अनेकजण रत्नागिरीत जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात लॉक डाऊनपूर्वी व लॉक डाऊननंतर तुम्हारे १२६  जण मुंबईतून रत्नागिरीत दाखल झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागातूनच यातील बरेच जण आले आहेत. त्यामध्ये मुंबई , डोंगरी, बांद्रा या भागांचा समावेश आहे. येथे संशयित रुग्णांचा पॉझिटिव रुग्ण आढळल्यामुळे जिल्ह्यात आलेल्या १२६ जणांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यापैकी शिरगाव तेथून १४ जणांना सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. तर उर्वरित संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात येणार आहे.