डॉक्टर मला बोलायचय..! जिल्ह्यात खास समुपदेश सेवा

रत्नागिरी:-कोरोना विषाणूबाबत माध्यमे आणि सोशल मिडीयावर सातत्याने येणारी माहिती आणि त्याचे आकलन यात अंतर पडत असल्याने अनेकांच्या मनात भितीने ताण वाढत आहे. अशा सर्वांसाठी डॉक्टर मला बोलायचय ही समुपदेशन सेवा जिल्हयात सुरु करण्यात आली आहे.

  सातत्याने एकच विषय कानावर पडत असल्याने व चर्चिला जात असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. दावे-प्रतिदावे यातून गैरसमज व मानसिक ताणही वाढत आहे. अशा व्यक्तींच्या मदतीसाठी ही समुपदेशन सेवा जिल्हा शासकीय रुग्णालयाने सुरु केली आहे. ही सेवा विनामुल्य आहे.

 जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशन लोंकाना दूरध्वनीद्वारे संवाद साधतील व त्यांच्या मनातील गैरसमज व भिती दूर करण्यास मदत करतील असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

  या योजनेत कोरोनाच्या भीतीमुळे मानसिक तणाव निर्माण झाल्यास आपण आपल्या भावना मानसोपचार तज्ञ व कौन्सिलर यांच्याशी बोलून व्यक्त करु शकता. ही मंडळी आपल्याला विनामुल्य समुपदेश करणार आहेत. ही मंडळी पुढीलप्रमाणे त्यांच्या समोर दर्शविलेल्या वेळेत उपलब्ध असतील. तरी नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी डॉ. मयुरा भागवत – मानसोपचार तज्ञ – दुपारी 03 ते 05 – मो.क्र. ८९९९६८८५३४, डॉ. संजय कलगुटकी –  मानसोपचार तज्ञ – संध्याकाळी 07.30 ते रात्री 10.30 -मो.क्र.९४०५५६९६२०, डॉ. स्नेहल तोडकर – मानसोपचार तज्ञ – दुपारी 02 ते 04 – मो.क्र. ९४०५७१८७०८, श्री. कृणाल देसाई – व्यावसायोपचार तज्ञ – पूर्ण वेळ – मो.क्र.९९८७५९५७७२, श्री. प्रमोद शाक्य – सायकॉलॉजिस्ट – सकाळी 10 ते 12 – मो.क्र. ८४५९८२६२८८, श्री. नितीन शिवदे – समाजसेवा अधिक्षक – दुपारी 02 ते 05 – मो.क्र.९५९४९३७४९८

यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.