पावस नाखरेत बिबट्याचा भुकेने बळी

रत्नागिरी:-रत्नागिरीतील पावस नाखरे येथील खांबडवाडी येथे मंगळवारी सकाळी मृत अवस्थेतील बिबट्या आढळला. मागील काही दिवसांपासून भक्ष्य न मिळाल्यांने नाखरे खांबडवाडी येथे बिबट्याचा मृत्यू झाला. वन विभागाच्या अधिकार्यांनी मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नाखरे खांबटवाडी येथील आंब्यांच्या बागेत बिबट्या मृतावस्थेत असल्याचे काहि ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. परिक्षेत्रिय वनाधिकारी प्रियांका लगड यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृत बिबट्याचा पंचनामा करुन शवविच्छेदन करण्यात आले. पशू वैद्यकिय अधिकार्यांनी केलेल्या शवविच्छेदनात बिबट्याला भूकेमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.
सुमारे दोन वर्षाचा नर जातीचा बिबट्या असून त्याला बरेच दिवस भक्ष्य न मिळाल्याने त्याचा भूक बळी गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्याचा पहिला भूक बळी गेल्यानंतर आता वन्य प्राण्याच्या भक्ष्यासाठी सरकर नेमके काय करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.