कोकणनगर येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या.

रत्नागिरी:-शहरातील कोकणनगर येथे तरुणाने अज्ञात कारणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली.श्रीकांत शंकर जाधव (30,रा.कोकणनगर,रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घरी सिलिंगच्या हुकला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हि बाब त्याच्या घरातल्याना समजताच त्यांनी शहर पोलिसाना याची माहिती दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.आत्महत्ये मागील कारण समजू शकले नसून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.