लॉकडाउन असलेल्या राजीवड्यात शुल्लक कारणातून तणाव.

रत्नागिरी:- लॉकडाउन असलेल्या राजीवडा भागातून हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या महिलेकडे कागदपत्र मागीतल्याच्या शुल्लक कारणातून सोमवारी सकाळी राजीवडा भागात तणाव निर्माण झाला. बघता बघता सम्पूर्ण राजीवडा मोहल्ला जमा झाला. अखेर पोलीस बळाचा वापर करून जमावावर नियंत्रण मिळवण्यात आले. पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढेंसह वरिष्ठ अधिकारी शिघ्र कृती दालासह घटनास्थळी धाव घेतली. संचारबंदी असताना बेकायदा जमाव केल्याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरु होते.

राजिवडानजिकच्या शिवखोल येथे एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाच्या सुचनेवरुन पोलीसांनी सुमारे दिड किलो मिटरचा परिसर सिल केला आहे. त्या भागात जा-ये करण्याला बंदी घालण्यात आली आहे. तर राजिवडा भागाच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा प्रशासनामार्फत पुरविण्यात येत आहेत.तर वैद्यकिय मदत प्रशासनामार्फत देण्याचे काम सुरु आहे.
सोमवारी सकाळी राजिवडा भागातील एक महिला हॉस्पिटलला जाण्यासाठी खडपेवठार येथील पोलीसांच्या नाक्याजवळ आली होती. तुम्ही हॉस्पिटलला जाताय तर हॉस्पिटलचे कागदपत्र दाखवा अशी विनंती तेथील पोलीसांनी केली. यावेळी तेथे असलेल्या काहि व्यक्तींनी पोलीसांशी हुज्जत घातली. त्यानंतर काहि क्षणातच संपुर्ण राजिवाडा गावाातील नागिरकांनी खडपेवठार येथे धाव घेतली. पोलीस कर्मचार्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता नागरिक खडपे वठारकडे जात होते.

अखेर तेथील कर्मचार्यांना या घटनेची माहिती पोलीस निरिक्षक अनिल लाड यांना दिली. त्यांनी पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, उपविभागिय अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह शिघ्रकृती दलाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी जमावाला पुन्हा आपल्या घरी जाण्याची विनंती केली. त्यांनतर काहिंना पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर जमाव पांगला.
संचारबंदी असताना मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर आल्यामुळे राजिवडा भागात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. लॉकडाउन च्या पहिल्याच दिवशी आरोग्य पथकाला रोखणात आले होते. त्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. असे असताना पुन्हा सोमवारी जमाव रस्त्यावर आल्यामुळे पोलीसांनी त्या भागात कडक बदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुढे कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा पोलीसांनी दिला आहे. तेथील जनतेला आवश्यक आत्यावश्यक सेवा देण्यात येत आहेत. आजारी असलेल्या व्यक्तींची माहिती पोलीसांना द्या, पोलीस त्यांना रुग्णालयात दाखल करतील अशी विनंतीही पोलीसांनी केली आहे.