६ मच्छिमारांविरोधात गुन्हा दाखलरत्नागिरी:- कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जारी केलेले प्रतिबंधात्मक आदेश मोडीत काढत राजिवडा खाडीत मासेमारी करीत असलेल्या ६ मच्छिमारांविरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पहाटेच्या सुमारास हे सर्व मच्छिमार मासेमारी करताना सागरी गस्ती पथकाला आढळून आले . मत्स्य विभागाने ही तक्रार दाखल केली आहे . राजिवडा खाडीकिनारी मासेमारी बोटीतून ६ जण पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मासेमारी करीत होते . याप्रकरणी राहील इमामुद्दीन म्हस्कर ( ३०), शौकत अब्दुल्ला मुकादम (६३),अब्दुल सत्तार मोहम्मद मजगांवकर (५०), शौकत अब्दुल मुकादम ( ६०), नाझीर कासम मजगांवकर (६१), करिमा नासीर मजगांवकर ( ५५, सर्व राहणार कर्ला )यांच्या विरोधात भा. द. वि. क. २६९ , १८८ ,३४ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम ३ ,४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे .