दिलासादायक; राजीवड्यातील नऊ जणांसह तेरा जण कोरोना निगेटिव्ह

रत्नागिरी:- राजीवडा येथील कोरोना बाधित रुग्णच्या संपर्कात आलेल्या नऊ रुग्णांसह एकूण तेरा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

राजीवडा येथील कोरोना बधितांच्या संपर्कात असलेल्या ९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.एकूण १३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते निगेटिव्ह आहेत. तर जिल्हा रुग्णालय अंतर्गत एकूण १०९ नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील १०७ नमुने निगेटिव्ह आले. तर २ जण पॉझेटिव्ह आढळले होते. त्यापैकी एकाचा नमुना निगेटिव्ह आला असून पॉझेटिव्ह एक रुग्णचा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.

शिवखोल येथे कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर सिल करण्यात आला आहे.तर कोचिवली एक्सप्रसेमधून त्याच्या सोबत प्रवास करणार्या सहप्रवाशांचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे. त्यातील काहि प्रवासी चिपळूण, रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले आहेत. त्यांचीहि तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करुन घेण्यात आले आहे.
दिल्ली नजिकच्या निजामुद्दीन मरकज येथे धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्या कार्यक्रमात देशातील विविध भागातून अनेक नागरिक गेले होते. महाराष्ट्रसह रत्नागिरी जिल्ह्यासह शहरातून काही नागरिक निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यातील राजिवडानजिकच्या शिवखोल येथे रहाणार्या एका व्यक्तील त्रास जाणवू लागल्याने तो दि.१ एप्रिल रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झाला होता. तो दि.१८ मार्च रोजीच रत्नागिरी शहरात पोहचला होता. त्यानंतर तो घरीच रहात होता.
त्या रुग्णाचा अहवाल पॉझेटिव्ह आल्यानंतर त्याच्य संपर्कात आलेल्या ९ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ९ जणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. रविवारी अहवाल प्राप्त झाला असून ९ हि जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.तर राजिवडा परिसरात आरोग्य पथका मार्फत प्रत्येक नागरिकांची तपासणी सुरु आहे.