कशेळी येथील रास्त धान्य दुकानात रेशनधारकांनी पाळलं सोशल डिस्टंस

राजापूर:- जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोशलडिस्टंन्स पाळण्याची कळकळीची विनंती जिल्हा प्रशासन अर्थात जिल्हाधिकारी साहेब तसेच राजापूर प्रांताधिकारी खाडे साहेब, तहसीलदार वराळे मॅडम करत आहेत. मात्र काही रास्त धान्य दुकानावर सोशलडिस्टंसची ऐशी की तैशी केल्याचे दिसून येत आहे.अनेक दुकाना बाहेर मोठी गर्दी दिसून येते. मात्र कशेळी येथील सरकारमान्य रास्त धान्य दुकानात आज पासून रेशन वितरण करण्यात येत आहे. यावेळी कशेळी गावातील रेशनकार्डधारकांनी शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले.यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शशिकांत वारीशे, पोलीस पाटील प्रमोद सुतार, राजन आगवेकर उपस्थित होते.यावेळी रास्त धान्य दुकानावर महिला आणि पुरुष रेशनकार्डधारक उपस्थित होते. धान्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव करणार्‍या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन यावेळी करण्यात आले.यावेळी रेशन खरेदी करताना सुमारे एक मिटरचे अंतर म्हणजे सोशलडिस्टन्स ठेवण्यात आले होते. रांगेत उभे राहून रेशनधारक धान्य घेत होते.सोशलडिस्टन्सचे तंतोतंत पालन करत होते.