रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय रजनी रविंद्र भाजये या महिलेचा पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना समोर आली. रजनी भायजे असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मृतदेह पूर्णतः जळाला असल्याने त्यांनी आत्महत्या केली की घातपात याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
रजनी भाजये गुरुवारी रात्रीपासून त्या बेपत्ता होत्या. शुक्रवारी सायंकाळी गावच्या सड्यावर जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर नातेवाईकांनी ग्रामीण पोलीसांना याची माहिती दिली. घटनास्थळी रॉकेलचे कॅन, बॅटरी सापडली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री कदम यांच्या मर्गदर्शनखाली सुरू आहे.