रत्नागिरी:-शृगांरतळी येथील कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा कोरोना मुक्त झालेला असतानाच आता दिल्ली नजिकच्या निजामुद्दीन मरकज येथून मुंबई व तेथून कोचिवली एक्सप्रेसने रत्नागिरी शहरात आलेल्या एकाचा अहवाल पॉझेटिव्ह आला आहे.संबधीत व्यक्ती शहरातील राजिवडा नजिकच्या शिवखोल मध्ये वास्तव्याला असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पॉसिटीव्ह अहवाल आल्यानंतर जिल्हा प्रशासनासह यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण सापडलेला परिसर सिल करण्यात आला आहे.तर तेथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर कोचिवली एक्सप्रसेमधून त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे. त्यातील काहि प्रवासी चिपळूण, रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले आहेत. त्यांचीहि तपासणी करण्यात येणार आहे.
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहिर केले.मात्र याच कालवधीत दिल्ली नजिकच्या निजामुद्दीन मरकज येथे धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्या कार्यक्रमात देशातील विविध भागातून अनेक नागरिक गेले होते. महाराष्ट्रसह रत्नागिरी जिल्ह्यासह शहरातून काही नागरिक निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यातील राजिवडानजिकच्या शिवखोल येथे रहाणाऱ्या यक्तीला त्रास जाणवू लागल्याने तो दि.१ एप्रिल रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झाला होता. तो दि.१८ मार्च रोजीच रत्नागिरी शहरात पोहचला होता. त्यानंतर तो घरीच रहात होता.
१ एप्रिल रोजी तो जिल्हा रुग्णालायत दाखल झाला होता. त्यानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी त्यांचे नमुने जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाले असून शिवखोलमधील त्या रुग्णाचे नमुने पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असून शिवखोल, राजिवडा परिसर सिल करण्यात आला आहे. त्या भागात फिरण्याला शंभर टक्के बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना पोसिटीव्ह व्यक्ती दि. मार्चपासून रत्नागिरीत वास्तव्याला असल्याने तो किती नागरिकांच्या संपर्कात आला आहे. याचा शोध सुरु करण्यात आला आहे. त्यांनंतर त्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.