रत्नागिरीतील रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ रोखण्यासाठी ना. सामंत आघाडीवर.

रत्नागिरी:-लाॅकडाऊनच्या दहाव्या दिवशी रत्नागिरीतल्या रस्त्यांवर गाड्यांची वर्दळ वाढलेली पहायला मिळत होती. त्यामुळेच हि वदर्ळ रोखण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत थेट रस्त्यावर उतरले. लाॅकडाऊनच्या काळात अनावश्यक बाहेर पडणाऱ्यां लोकांना समजवण्यासाठी ते रस्त्यावर उतरले. रत्नागिरीतल्या माळनाका परिसरातल्या पोलिस चेक पोस्टवर त्यांनी स्वतः गाड्या थांबवत लोकं नेमकी कोणत्या कारणांसाठी बाहेर पडत होती, याची पाहणी केली. तसेच अनावश्यक फिरणाऱी वाहने सापडतात का याची सुद्धा त्यांनी पहाणी केली. आशा गाड्यांवर कडक कारवाई करा आशा सूचनाही त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिल्या. दरम्यान उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या तपासणीत कोणी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर बाहेर पडलेले आढळून आले नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी ईपास घेतलेलीच मंडळी रस्त्यावर पहायला मिळाली. मात्र लाॅकडाऊनच्या काळात अनावश्यक फिरणाऱ्या सर्वांवर कडक करावाई करण्याचे आदेश उच्च आणि तंत्र शिक्षण मत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांमधून तिकडची माणसं कोणी घेऊन येऊ नयेत, अशा सूचनाही उदय सामंत यांनी यावेळी दिल्या..