‘फिनोलेक्स’ व मुकुल माधव फाउंडेशन यांचेकडून जिल्हा प्रशासनाला ३० लाख रुपयांची मदत

रत्नागिरी:-सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असून या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारने विविध उपाययोजना योजलेल्या आहेत त्यामध्ये जनतेमध्ये कोरोना सारखा रोग पसरू नये म्हणून कोणीही घराबाहेर पडू नये असा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा कठोर निर्णय त्यांना घ्यावा लागला आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांनी जीवनावर प्राधान्य देण्याच्या दृष्टीने पाठिंबा दिलेला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन अथक परिश्रम घेत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून व प्रशासनाच्या आव्हानात्मक उपक्रमाला फिनोलेक्स इंडस्ट्रीज व सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला ३० लाख रुपये कोरोना वरती उपायोजना करण्याकरता वैद्यकीय सहाय्य पोटी देण्यात आले. या आर्थिक सहाय्याकरिता जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले आहेत.