रत्नागिरी:-कोरोनाचे संकट संपूर्ण जगतावर आले आहे. या संकटाशी भारतवासीयही लढत आहेत. लॉक डाऊनचा पर्याय स्विकारून जनता ही या कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरली आहे.
या कठीण प्रसंगात वेळोवेळी मा.पंतप्रधान देश वासियांशी संवाद साधत आहेत. आज दि.०५ एप्रिलला रात्री ९.०० वा. सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या दारात , बाल्कनीत, खिडकीत येवून सर्व लाईट बंद करून दिवा, बॅटरी, मोबाईल, टॉर्च, मेणबत्ती ९ मिनिटे प्रज्वलित करावी. सर्वांनी प्रार्थना करावी असा संदेश दिला. इतक्या कठीण प्रसंगात मनोबल वाढवण्यासाठी मा.पंतप्रधानांनी दिलेला संदेश सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे. हिंदू धर्मात सामुहिक जपजाप्याचे वेगळे महत्व आहे. त्याच धरतीवर भारतातील समान नागरिकांनी एकाच वेळी दिपप्रज्वलन आणि प्रार्थना ही गोष्ट खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी आणि जगताला भारत मातेची प्रजा ही एकसंघ आहे हा संदेश देणारी ठरेल. एकात्मतेचे अनोखे दर्शन जगातला होईल. जनतेने मा.पंतप्रधानांच्या आवाहनाला मनापासून प्रतिसाद द्यावा.
सोशल डिस्टन्सचे तंत्र जपावे, गर्दी करू नये, कोरोना विरुद्ध लढ्यात आपण नक्की यशस्वी होऊन या रोगाचे समूळ उच्चाटन होईल हा विश्वास ह्या दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून वृद्धींगत होईल.