कोरोनाची खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

रत्नागिरी:-रत्नागिरी मारुती मंदिर येथील साजिद ट्रेडर्स चे मालक गणी कादर मुसानी यांच्या बाबत सोशल मीडियावर खोटी अफवा पसरवणाऱ्या तिघांविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गणी कादर मुसानी ( 38, रा. नाचणे रोड) यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. गणी मुसानी यांचा मारुती मंदिर येथे साजिद ट्रेडर्स नावाने किराणा व्यवसाय आहे. गणी मुसानी यांचे वडील दिल्लीतील मरकत कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमाला 2000 लोकांमध्ये सहभागी होऊन आल्यानन्तर घरी येऊन बसले आहेत. त्यांनी टेस्ट देखील केलेली नाही. चार दिवसात जो कुणी त्याच्या दुकानात येऊन गेलाय त्यांचा शोध सुरू असल्याची एक पोस्ट जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. गुरुवारी दिवसभर ही पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती.

गणी मुसानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पवन रसाळ, कोहिनूर ग्रीन वूड्स सहकारी गृहनिर्माण संस्था नाचणेचे अध्यक्ष यांनी जाहीर सूचना म्हणून वरील पोस्ट व्हायरल केली तर नवलाई मित्र मंडळ बाजारपेठ यांच्या ग्रुपवर देखील ही पोस्ट टाकण्यात आली. गणी मुसानी यांचे वडील दिल्ली येथे गेले नसताना गुरुवारी सायंकाळी आठ वाजता जिल्हा रुग्णालयातील नर्स घरी येऊन वडिलांना तपासायचे आहे असे सांगितले. यानंतर आम्ही वडिलांना घेऊन जिल्हा रुग्णालयात गेलो. वडिलांची तपासणी सुरू आहे. परंतु मरकत येथे माझे वडील गेले नसताना, त्यांना कोरोना रोगाची लक्षणे नसताना त्यांना कोरोना लागण झाली आहे अशी अफवा पसरवून, अब्रू नुकसानी आणि बदनामी केल्या प्रकरणी गणी मुसानी यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.