एक हात मदतीचा; आवळीच्यावाडीतील युवकांनी जपली सामाजिक बांधिलकी.

राजापूर:- कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉक डाऊन जाहीर केल्या आहे.त्यामुळे अनेकांचा रोजगार तर गेलाच आहे.मात्र ज्यांचा हातावर पोट आहे त्या निराधारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेकांना पोटापाण्याचा प्रश्न पडलाय.असाच प्रकार राजापूर तालुक्यातील कशेळी घडला आहे.येथील बौद्धवाडीत समाज कल्याण विभागाकडून दलित वस्ती अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. परंतु पूर्ण काम होऊनही त्या मजुर कुटुंबाच्या हातात पैसे मिळाले नव्हते.त्यामुळे कामासाठी आलेले मजूर व त्यांच कुटुंब उपाशी पोटी जीवन जगत होते. दरम्यान याची माहिती आवळीचीवाडी येथील युवकांना समजतात ‘त्या’ युवकांनी एक हात मदतीचा पुढे करत आपली सामाजिक बांधिलकी राखत आहे. ‘त्या’ युवकांनी मजूर कुटुंबाला धान्य स्वरूपात मदत केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वारीशे, आदित्य राडये,सुशांत राडये,स्वप्नील माळी आदी उपस्थित होते.