रत्नागिरी:- समुद्रमार्गे बोटीतून कोकणात येण्याचे प्रकार ताजे असताना आता थेट आंबा वाहतुकी आडून लोक कोकणात येत असल्याचं उघड झाले आहे. रत्नागिरीत पोलिसांनी अशाच तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीअंती तिघेही पनवेलहून आल्याचं उघड झाले. दरम्यान या तिघांना तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय, पोलिसांनी अधिक तपास करत अशा लोकांची गय करू नये. तसेच असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे आदेश देखील यावेळी उदय सामंत यांनी पोलिसांनी दिलेत. तर, आंबा बागायतदार आणि वाहतूकदार यांना बोलावून याबाबत अधिक खबरदारी घ्या. पु्न्हा असे घडता कामा नये अशी समज देखील दिली. सध्या हापूस आंब्याच्या वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर त्याचाच फायदा हा लोकांकडून उचलला जात आहे.