रत्नागिरी:-जिल्हाभरात गुरुवारी राम जन्मोत्सव भक्तांविना साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या जमावबंदीमुळ्ये राम जन्मोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले.
दरवर्षी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रत्नागिरीच्या राम मंदिरात तर राम जन्मोत्सवा निमित्त भक्तांची मोठी गर्दी होत असते. दरवर्षी राम जन्मोत्सवाच्या दिवशी दुपारी १२ च्या ठोक्याला ‘प्रभू सीयावर रामचंद्र की जय.. ‘चा जयघोष करण्यात येतो. मंदिरामध्ये जमलेल्या महिलांची धावपळ उडते ती प्रभू रामाला पाळण्यामध्ये घालण्यासाठी. यावर्षी मात्र या परंपरेला खंड पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी काढण्यात येणारी रथयात्रा देखील स्थगित करण्यात आली आहे.