सैतवडे गावातील बोरसई जमातकडून धान्य वाटप.

रत्नागिरी:-कोरोनामुळे आलेल्या संकटाला तोंड देताना भारत बंद काळात मौजे सैतवडे गावातील बोरसई जमातकडून संपूर्ण मोहल्ला व जवळच असणारी चर्मकारवाडी,बाहेरील गावातून कामानिमित्त इथे राहत असणारी काही कुटुंबं या सर्वांना आज मोफत धान्यवाटप करण्यात आले.
यामध्ये जीवनावश्यक तांदूळ, डाळ, साखर, चवळी, तेल,कांदा,बटाटा, चहापावडर यांचे वाटप करण्यात आले.गावातील युवा मंडळींनी यामध्ये पुढाकार घेतला.हशामुद्दीन सय्यद, वहाब खलपे,जावेद काजी,साजिद शेकासन,नौशाद बोंद्रे,अरमान शेकासन,इम्रान चिकटे,मुजफ्फर सय्यद, आसिफ पेटकर,आसिम शेकासन,अल्फियान सय्यद असे अनेक युवक पुढे येवून लोकांना अतिशय कोरोनागाईडलाईन प्रमाणे वितरीत केले.अजून पंधरा दिवसानंतर अशीच स्थिती राहीली तर परत याच जीवनाश्यक वस्तूंचे परत वितरण करण्याची तयारी या युवामंडळाने ठेवली आहे. पण गावातील आपल्या लोकांचे आरोग्य महत्त्वाचे असून ते जपण्याची आमची युवकांची जबाबदारी आहे हे या कार्यातून त्यांनी दाखवून दिले आहे. गोरगरीब तसेच काही वयोवृद्ध लोकांना दुकानात जाता येत नव्हते त्यांची धान्याची व्यवस्था या मंडळांनी केली.असेच तरुणांनी पुढे येवून आपल्या शेजारी पाजारी यांना मदत करुया याप्रसंगाला आपण सर्वांनी एकमेकांना मदत करुन मात करु असे आवाहन केले.